

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३०) रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ-माहीमदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्रीनंतर रविवारी एक ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.
------------
मध्य
कुठे : ठाणे- कल्याण अप - डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/सेमी जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. मुलुंड स्थानकातून अप धीम्या मार्गावर त्या वळवण्यात येतील.
------------
हार्बर
कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.
.............
पश्चिम
कुठे : सांताक्रूझ-माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : पहाटे १ ते ४.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकादरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अप-डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने लोकल गाड्या लोअर परेल, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देणार आहेत. या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.