ठाणे पूर्व भागात ५४ `सीसीटीव्हींचे जाळे

ठाणे पूर्व भागात ५४ `सीसीटीव्हींचे जाळे
Published on

ठाणे पूर्व भागात ५४ सीसीटीव्हींचे जाळे
महिला-नागरिकांना सुरक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाड्यापासून कोपरी गावापर्यंत ५४ सीसीटीव्हींचे जाळे उभारण्याच्या कामाला शुक्रवारी (ता. २८) सुरुवात करण्यात आली आहे. या सीसीटीव्हींमुळे कोपरीतील महिला व सामान्य नागरिकांना हक्काची सुरक्षा मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पूर्व भागात भुरट्या चोऱ्या, सोनसाखळी चोरी आणि वाहने चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता. या निधीसाठी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही सहकार्य केले. या प्रयत्नांमुळे कोपरी पोलिस ठाणेअंतर्गत ५४ सीसीटीव्ही मंजूर करण्यात आले. भरत चव्हाण यांच्या सूचनेनुनार या भागातील गजबजलेल्या व आवश्यक ठिकाणांचा सीसीटीव्हीत समावेश केला आहे. चेंदणी कोळीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. येत्या तीन महिन्यांत चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, कोपरी गावापर्यंतच्या परिसरासह संपूर्ण ठाणे पूर्व भागात सीसीटीव्ही बसविले जातील. त्यानंतर कोपरी पोलिस कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित व्यक्तींवर नजर ठेवतील. त्यामुळे ठाणे पूर्वमधील सामान्य नागरिकांसह, महिला, मुले, तरुणींना सुरक्षेचे जाळे उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com