नाल्यावरील खाऊगल्लीमुळे हजारो जीव धोक्यात

नाल्यावरील खाऊगल्लीमुळे हजारो जीव धोक्यात
Published on

नाल्यावरील खाऊ गल्लीमुळे हजारो जीव धोक्यात
वसई-विरार महापालिका बांधकाम विभागाची भीती
अधिकाऱ्यांविरोधात शिवसेनेची (शिंदे गट) कारवाईची मागणी
विरार, ता. ३० (बातमीदार) : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या इशाऱ्यालाच वसई-विरार महापालिकेच्या बाजार विभाग व अतिक्रमण विभागाने बेदखल केले आहे. वसईतील नरवीर चिमाजी आप्पा मैदानालगतच्या नाल्यावरील तब्बल ८० हातगाड्यांमुळे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या नाल्याचे डिझाइन ‘सेल्फ लोड’ विचारात घेऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नाल्याचा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकणार नाही. या भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा धोका असल्यामुळेच बाजार विभाग व अतिक्रमण विभागाने या नाल्यावरील अनधिकृत खाऊ गल्ली तत्काळ हटवावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या आहेत.

याबाबत दोनदा स्मरणपत्र देऊनही या दोन्ही विभागांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाचे जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी केली आहे.
नरवीर चिमाजी आप्पा मैदानाशेजारील नाल्यावर वसई-विरार महापालिकेने स्लॅब टाकला होता. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’मध्ये हा स्लॅब अत्यंत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. या नाल्यावरील हातगाड्या हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार विभागाला पत्रही दिलेले आहे. तसेच नाल्यावर महापालिकेने फलक लावून सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिलेला आहे. त्यातच आता नाल्यावरील स्लॅबवर तात्पुरते होणारे बांधकामही वाढत असल्याचे निरीक्षण बांधकाम विभागाने नोंदवले आहे. या अतिरिक्त भारामुळेच जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
नाल्यातील कचऱ्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायूही तयार होतो. दुसरीकडे येथे मोठ्या प्रमाणात गॅस शेगड्यांचा वापर होतो. त्यामुळे येथे दुर्घटनाही घडण्याची शक्यता आहे.
===============================================
नाल्यावरील हातगाड्या त्वरित हटविण्याच्या सूचना बांधकाम विभागाने दिल्या आहेत. मात्र बाजार विभाग व अतिक्रमण विभागाच्या पत्राची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करीत बाजार विभागाच्या अभियंत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
- अतुल पाटील, जिल्हा सचिव, पालघर
===============================================
येत्या दोन-तीन दिवसांत या हातगाड्यांवर कारवाई करण्यात येईल. कारवाई करण्यासंदर्भात आपल्यावर कोणताही दबाव नाही. त्यामुळे ही कारवाई नक्की होईल.
- राजीव पाटील, बाजार विभाग अधीक्षक, प्रभाग समिती आय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com