

--------------
वसईत देहदान, अवयवदान चळवळीची गुढी
वसई तालुक्यातून अनेक दाते येत आहेत पुढे
वसई, ता. ३० (बातमीदार): प्रसाद जोशी
देहदान, अवयवदान हे एक नव्हे तर अनेक व्यक्तींना वरदान ठरत असते. मृत्यूनंतर आपला देह अन्य लोकांच्या कामी यावा यासाठी अगोदरच इच्छा व्यक्त केली जाते, तर अनेक कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर अवयव, देहदानासाठी पुढे येत असतात. पालघर जिल्ह्यातही या चळवळीला बळकटी मिळू लागली असल्याने समाज जागृतीचा हा प्रभाव अनेकांना नवे जीवदान देऊ लागला आहे.
वसई-विरार शहर महापालिकादेखील या चळवळीत सहभागी झाली आहे. मृत्यूनंतर अवयवदान, नेत्रदान, त्वचादान आणि देहदान केलेल्या कुटुंबीयांचा नागरी सत्कार केला जातो. अवयवदान जनजागृतीसाठी पालिकेच्या वतीने विविध योजनाही राबविल्या जात आहेत.
एकीकडे समज-गैरसमज असताना या चळवळीला उभारी देण्यासाठी ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’चे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील व त्यांचे सहकारी हे ज्या ठिकाणी देहदान, अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली जाते तिथे पोहोचतात. त्यामुळे या मोहीम यशस्वी होत आहेत.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
अवयवदान, देहदान चळवळीला अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये अवयवदान विषयावरील निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर मृत्यू प्रमाणपत्रावर (फॉर्म चार ए) नेत्रदानासह त्वचादान व देहदानाचा उल्लेख करण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच आरोग्य विभागातर्फे महापालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी, अंगणवाडी व आशा वर्कर्स यांच्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम व कार्यशाळादेखील आयोजित केल्या जाणार आहेत. देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मृत्यूपत्र त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी दखल घेतली जाणार आहे. याखेरीज अनेक उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
००००००००००००००००००००००००००००००
---------------
वसई-विरार महापालिकेकडेदेखील अवयवदान, देहदान चळवळीच्या जनजागृतीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून मागण्या केल्या आहेत. या सकारात्मक निर्णयांची वेळेत अंमलबजावणी झाल्यास वसई-विरार शहरात अवयवदान चळवळीला विशेष गती मिळेल.
पुरुषोत्तम पवार, अध्यक्ष, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन
------------------
देह आणि अवयवदानी पुढे यावेत यासाठी वसई-विरार शहर महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. यासाठी विविध उपक्रमदेखील पुढच्या कालावधीत घेणार आहोत. त्यामुळे गरजूंना लाभ मिळू शकेल.
अनिलकुमार पवार, आयुक्त
------------------
----------------
आश्रमशाळेतदेखील इच्छुक
पालघर जिल्ह्यातील वाडा येथील आश्रमशाळेत ८७ वर्षीय इसम राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर समाजाला प्रेरणा दर्शविणारे कार्य त्यांच्या पत्नीने केले व पतीच्या देहदानाचा निर्णय घेतला, ही विशेष घटना होती.
---------------------
वसई : वसई-विरार महापालिका अवयवदान, देहदान जनजागृती करताना
फोटो - पुरुषोत्तम पाटील
अनिलकुमार पवार, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.