

खारघर, ता. ३० (बातमीदार) : गुढीपाडवा मराठी नववर्षानिमित्त खारघरमधील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने शिल्प चौकात गुढीपूजन करण्यात आले. ‘मी मराठी, माझी मराठी’च्या वतीने शिल्प चौकात रस्त्याच्या कडेला सिमेंट कठड्यावर ‘नवीन वर्षाची एकच हाक, मातृ भाषेला घालू साद’, ‘माय मराठी आमची झाली हो अभिजात’ आदी लावलेले स्टिकर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
मराठी नववर्षदिनी शोभायात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शोभायात्रेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे तेजस्विनी महिला मंडळ, मराठी ब्राह्मण संघ, विश्व मांगल्य सभा, भारत विकास परिषद आणि संघर्ष समिती आदी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिल्प चौकात गुढीचे पूजन करून गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मतदान जागृती, पाणी, वीज बचत, प्लॅस्टिकमुक्ती, अवयवदान आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. या सोहळ्यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. गेल्या २० वर्षांपासून खारघरमध्ये शोभायात्रा काढून गुढीपाडवा नववर्षदिन साजरा केला जात असे, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिल्प चौकात गुढी उभारून उत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त या वेळी दारूमुक्त खारघर हा उद्देश समोर ठेवून गुढी उभारण्यात आली, अशी माहिती तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्षा त्रिवेणी सालकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.