रोशनीतर्फे मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन

रोशनीतर्फे मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन
Published on

रोशनीतर्फे मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन
कासा, ता. ३० (बातमीदार) : डिजिटल माध्यमांच्या आहारी गेलेल्या युवा वर्गाचे मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी रोशनी फाउंडेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. २२) मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर वंकास जिल्हा परिषद शाळा, मुसळपाडा जिल्हा परिषद शाळा आणि बहारे जिल्हा परिषद शाळा येथे तीन सत्रांत पार पडले. समुपदेशक डॉ. प्रज्ञा कांडे यांनी डिजिटल माध्यमांच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या, फसवणूक प्रतिबंध आणि वेळेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी रोशनी फाउंडेशन ट्रस्टच्या संस्थापक गीता मृच्छाला यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य ओळख व संरक्षण यावर मार्गदर्शन केले.
या शिबिरात तलासरी तालुक्यातील विविध शाळांतील ८५ मुले-मुली आणि डहाणू तालुक्यातील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी शाळांमध्ये काजली, आमगाव ठक्करपाळा, गिरगाव डोल्हारपाडा, डोंगरी पाटीलपाडा, आंबोली, नागझरी मुसूपाडा, सोगावे, करजगाव ठाकरपाळा आणि करजगाव पाटीलपाडा यांचा समावेश होता. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com