

किशोरवयीनांच्या आरोग्यात मेट्रोपोलिस फाउंडेशनकडून बदल
मुंबई, ता. ३० : मेट्रोपोलिस हेल्थकेअरची सीएसआर शाखा मेट्रोपोलिस फाउंडेशनतर्फे किशोरवयीन मुलींच्या आरोग्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत सव्वादोन लाख मुलींच्या आरोग्यात त्यांनी चांगले बदल केल्याचे सांगितले.
‘टू शाय टू टेल’ हा त्यांचा प्रमुख सीएसआर उपक्रम असून, त्यासाठी त्यांनी एक परिषद घेऊन किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक केले. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींना प्रजनन आणि लैंगिक शिक्षण दिले जाते. दोन लाख किशोरवयीन मुलींना हे शिक्षण दिल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा त्यांच्या १० लाख कुटुंबीयांना आणि समुदायालादेखील झाला. या उपक्रमात किशोरवयीन मुलींचे सल्लागार गट किशोरी मंच हे बालविवाह, मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता अशा सामाजिक समस्यांचे निराकरण करतात. यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणीही केली जाते. त्यायोगे समाजाची वागणूक बदलून दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन होते, असा दावा मेट्रोपोलिस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गुरु शहा यांनी केला.
यासंदर्भातील परिषदेत शंभरहून अधिक किशोरवयीन मुलींच्या गटप्रमुख, स्वयंसेवी संस्था, पंचायत सदस्य, आरोग्यसेवा तज्ज्ञ एकत्र आले. या वेळी या उपक्रमाच्या काही यशोगाथादेखील सांगण्यात आल्या. मुंबईत किशोरी मंचच्या सदस्यांनी हस्तक्षेप करून आयेषाचा बालविवाह रद्द करण्यास पालकांना भाग पाडले व ती पुन्हा शाळेत जाऊ लागली. पालघरमध्येही तरुणींनी ग्रामपंचायतीला बालविवाह प्रथेविरोधात ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. पुण्यात किशोरवयीन मुलींनी शाळांमध्ये योग्य स्वच्छता सुविधा स्थापन करण्याची खातरजमा केली. त्यामुळे मुलींची शाळा गळती लक्षणीयरित्या कमी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.