शोभायात्रेतून सामाजिक संदेश

शोभायात्रेतून सामाजिक संदेश
Published on

वाशी, ता. ३० (बातमीदार) : चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यानिमित्त नवी मुंबईतील शहरांमध्ये ठिकठिकाणी पालखी मिरवणुकीससह शोभायात्रा काढण्यात आल्या. शोभायात्रामध्ये सामाजिक व पर्यावरणावर आधारित संदेश देण्यात आले. ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीमपथक आणि टाळ-मृदंगाच्या गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सोसाट्यांनी आपल्या परिसरात रांगोळ्या काढल्या होत्या. फेटे घालून तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच शोभायात्रेत सहभागी झाले होते. महिलांनीदेखील मराठमोळी नऊवारी परिधान करून दुचाकीवरून शोभायात्रेत सहभाग घेतला.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा अर्थात मराठी माणसाचा आनंदोत्सव. गुढीपाडवा म्हणजे मराठी संस्कार, संस्कृती, परंपरा यांचा त्रिवेणी संगम असून, त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी मराठी अस्मिता, मराठी अभिमान हे भावी पिढीला समजण्यासाठी नवी मुंबई शहरातील विविध भागांत शोभायात्रा काढण्यात आल्या. ऐरोलीमध्ये आपला कट्टा सामाजिक संस्थेच्या वतीने सेक्टर १० येथून सिद्धिविनायक मंदिरापासून सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी नेत्रदान, तसेच रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यात येत होती. ऐरोली सेक्टर आठमधील तुळजी भवानी मातेच्या मंदिराजवळ या शोभायात्रेची सांगता झाली. ध्वजपथक, लेझीम पथक आणि विविध पांरपरिक वेशभूषा, असे या स्वागत यात्रेचे स्वरूप होते. या वेळी स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, संपूर्ण देश पोलिओमुक्त करण्यासाठी महिलांनी जनजागृती करत घोषण दिल्या.
----------------
पारंपरिक रथांचा सहभाग
शोभायात्रामध्ये मराठमोळ्या पद्धतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईमधील ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. मुलांची मक्तेदारी असलेल्या या उपक्रमात मुलीही सहभागी होऊन गेल्या होत्या. शोभायात्रांमध्ये मराठमोळ्या पद्धतीने नटूनथटून आलेल्या तरुणाईपासून ज्येष्ठांनादेखील सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. वाशी सेक्टर २९ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल येथून गावदेवी मंदिरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सहयोगी संस्थेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. नेरूळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापासून श्री स्वामी समर्थ मठापर्यंत पारंपरिक रथांसह रॅली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com