

ठाणेकरांचा आता गारेगार प्रवास
परिवहनच्या ताफ्यात १६० इलेक्ट्रिक बस; निविदा प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणेकरांना गारेगार प्रवास करता यावा, यासाठी ठाणे परिवहन सेवेमार्फत पावले उचलण्यात येत आहे. त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात सुरुवातीला १२३ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. आता आणखी १६० इलेक्ट्रिक एसी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसच्या देखभालीसाठी १२ वर्षे तत्त्वावर ठेकेदार नेमला जाणार आहे. त्यासंदर्भातील निविदा परिवहनने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या बसदेखील परिवहनच्या ताफ्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात सद्यःस्थितीत ४४६ बस असून, आगामी काळात पीएम ई बससेवा योजनेअंतर्गत १०० व एनसीएपीअंतर्गत १५ व्या वित्तीय आयोगाअंतर्गत ८६ बस पुढील आर्थिक वर्षात दाखल होणे अपेक्षित आहे, त्याशिवाय १० डबल डेकर बसदेखील येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परिवहनच्या ताफ्यात यापूर्वीदेखील २०० बस जीसीसी तत्त्वावर चालविल्या जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता एनसीएपीअंतर्गत १५ व्या वित्तीय आयोगाअंतर्गत १६० बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुलैचा मुहूर्त
जीसीसी तत्त्वावर १२ वर्षे कालावधीसाठी या बस घेतल्या जाणार आहेत. यासाठी परिवहनने आता निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात नऊ मीटर ८० आणि १२ मीटरच्या ८० अशा प्रकारे १६० बसचा समावेश असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून १०० नवीन बस ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत. या सर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित आहेत. यात नऊ मीटरच्या ६० आणि १२ मीटरच्या ४० बसचा समावेश असेल. दरम्यान, या बस मार्चअखेरीपर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या, मात्र त्याला आता विलंब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बस जुलैअखेरीपर्यंत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सामील होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.