महावितरण काढणार डिजिटल ग्राहकांचा लकी ड्रॉ!

महावितरण काढणार डिजिटल ग्राहकांचा लकी ड्रॉ!
Published on

महावितरण काढणार
डिजिटल ग्राहकांचा लकी ड्रॉ

विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना आणली आहे. त्यानुसार पहिला लकी ड्रॉ ७ एप्रिलला, तर दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ अनुक्रमे मे व जूनमध्ये काढण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी प्रत्येक उपविभाग स्तरावर ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन भेट दिले जाणार आहेत, तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोनप्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १,३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन आणि प्रत्येकी दोनप्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १,३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्टवॉच बक्षीस दिले जाणार आहे.

महावितरणचे राज्यभरात सुमारे सव्वा तीन कोटी वीज ग्राहक आहेत. कृषिपंपधारक वगळता अन्य ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीजबिल दिले जाते. बहुसंख्य ग्राहक रोखीने किंवा धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी घरी बसून ऑनलाइन वीजबिल भरावे म्हणून महावितरणकडून वेगवेगळ्या प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहेत. त्याचा भाग म्हणून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीजग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला लकी ड्रॉ ७ एप्रिलला काढण्यात येणार असून दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ मे व जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com