

स्वागत यात्रेत कृषी पर्यटनाचा जागर
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या स्वागत यात्रेत विविध देखावे व चित्ररथांसह आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या डॉक्टर, नागरिकांचे फलक आणि कृषी पर्यटनाचा पुरस्कार करणाऱ्या चित्ररथांनी लक्ष वेधले. कल्याण संस्कृती मंच व इनर्व्हिल क्लब कल्याण संयुक्त विद्यमाने नववर्ष शोभायात्रेचे भव्य आयोजन केले होते. या स्वागत यात्रेत ढोल-ताशा पथकांसह २० हून अधिक गट आणि विविध चित्ररथ सहभागी झाले होते.
आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या गटाने हाती घेतलेले फलक बोलके होते. “कशाला वाया घालविता आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदाकडे द्या लक्ष” यांसारखी घोषवाक्य या फलकांवर लिहिली होती. कल्याणमधील निमा वुमन्स फोरम आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संदेश देण्यात आले होते, तर पर्यावरणपूरक कृषी पर्यटनाचा पुरस्कार करताना पाठारे वाडीच्या पथकाने अनोखा चित्ररथ साकारला. त्यांनी चित्ररथात एक छोटीशी कुटी साकारली होती आणि कुटीवर कृषी पर्यटनाविषयक चांगले संदेश लिहिले गेले होते. तसेच सुंदर झाडांनी हा चित्ररथ नैसर्गिकरित्या सजवला होता.
महिला लेझीम पथक
रेणूका पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला लेझीम पथकाने शोभायात्रेची सुरुवात केली. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे ४० ढोल व १६ ताशांनी वातावरण निनादून गेले. याच तालावर रणरागिणी लेझीम पथकातील ६० महिलांनी लेझीमची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. बालक मंदिर सेकेंडरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आठवीच्या मुले व मुलींचे बरची पथक या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. याबरोबरच प्रकाश बोराडे यांचे सरस्वती मंदिर माध्यमिक स्कूल आणि गजानन पाटील यांच्या कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलच्या शालेय मुला-मुलींनी लेझीमचे खेळ केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.