पालघरमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत

पालघरमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत
Published on

पालघर, ता. ३० (बातमीदार) : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेची भक्तिगीते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गायलेल्या पोवाड्याने पालघर शहर मंत्रमुग्ध झाले होते. यानंतर गुढीपाडव्यानिमित्त पालघर शहरात शोभायात्रा काढण्यात आली.

पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात सूर पहाटेचे या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती यांनी केले होते. या कार्यक्रमात हर्षाली लोखंडे-मुकणे, नंदकुमार सुर्वे, रुपक आचार्य, गायन अदिती काळे, तसेच शाहीर गंगाराम घरत यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर लक्ष्मीनारायण मंदिरापासून पालघर शहरात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून पालघरमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत शोभायात्रा हुतात्मा चौकाजवळ आल्यानंतर समारोप करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये महिला ढोल-ताशा पथकामध्ये सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com