

निळजे ते हेदुटणे रस्तेकामाला वेग
प्रांताधिकाऱ्यांकडून भूसंपादनाची सूचना प्रसिद्ध
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : निळजे ते हेदुटणे या डीपी रस्त्याच्या निर्मिती प्रक्रियेला वेग आला आहे. या रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची सूचना प्रांताधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रस्त्याची निर्मिती एमएमआरडीएमार्फत होत आहे. या रस्त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत होणार आहे.
एमएमआरडीएकडून कल्याण हे नवे विकास केंद्र म्हणून निश्चित केल्यानंतर या कल्याण भागात नवनवे प्रकल्प एमएमआरडीएकडून करण्यात येत आहेत. यात मेट्रो प्रकल्पांबरोबरच रस्ते प्रकल्पांचाही समावेश आहे. या कल्याण विकास केंद्रात निळजे ते हेदुटणे असा डीपी रस्ता निर्माण केला जाणार आहे. या रस्त्याच्या जमीन अधिग्रहणासाठीची प्रक्रिया कल्याणच्या उपविभागीय कार्यालयाने सुरू केली आहे. कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी जमीन भूसंपादनाची सूचनाही प्रसिद्ध केली आहे. तसेच याबाबत हरकती मागविल्या आहेत. या सूचनेत या रस्त्यात बाधित होणाऱ्या गावांची यादी आणि क्षेत्र दिले आहे. या जमिनींच्या मोबदल्यात जमीनधारकांना मोबदला मिळणार असल्याचेही नमूद केले आहे. विशेष म्हणजे, या भागात कोणतीही घरे येत नसल्याने पुनर्वसनाचा मुद्दाही निकाली निघाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील निळजे ते हेदुटणे हा प्रस्तावित डीपी रस्ता भोपर, उसरघर, माणगाव, काटई, निळजे, निळजेपाडा, घारीवली, कोळे या गावांमधून जाईल.
हरकतीसाठी १ एप्रिलपर्यंत वेळ
निळजे ते हेदुटणे मार्गामुळे प्रवासी आणि मालवाहतूक वाढणार आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल. त्याचबरोबर, शहरांतर्गत वाहतुकीला आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसेल. तसेच, सध्या बदलापूर - काटई मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्यायी मार्ग मिळणार आहे. मार्गाच्या जमीन संपादनासाठी संबंधित गावातील नागरिकांना हरकती किंवा नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी कल्याणमधील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात येत्या १ एप्रिलपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.