

धक्का लागल्याने एकाची हत्या; अल्पवयीन आरोपी ताब्यात
शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : हळदी कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून २१ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून हत्या करून मृतदेह भातसा नदीत फेकल्याची घटना कासगाव हद्दीत घडली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
बाळू वाघ (वय २१) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा शहापूर तालुक्यातील कासगावमध्ये कुटुंबासह राहत होता. तो उदरनिर्वाहासाठी याच गावात ट्रॅक्टरचालक म्हणून कार्यरत होता. तर आरोपीही याच गावात राहतात. कासगावमध्ये लग्नाच्या हळदी समारंभात मंगळवारी (ता. २५) बाळू हा नाचत असताना त्याचा धक्का १७ वर्षीय आरोपीला लागला. त्यानंतर आरोपी व बाळू यांच्यामध्ये वाद झाला. याचा राग आल्याने आरोपींनी बाळूला निर्जनस्थळ गाठून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह भातसा नदीपात्रात फेकून दिला. नदीपात्रात बुधवारी (ता. २६) अनोळखी मृतदेह आढळल्याने शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बाळू याची हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येताच शहापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन रविवारी (ता. ३०) बाल न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.