

अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोणी दाक्षिणात्य पेहराव, तर कोणी आगरी कोळी पेहराव केला होता. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचे मावळे, साधुसंत, माता जिजाऊ, राधा-कृष्ण, सीता-राम-लक्ष्मण, भरत, हनुमान, रावण अशा वेशभूषेत अनेक जण सामील झाले होते.
रथ, बैलगाडी, डोक्यावर वृक्ष दिंडी, टाळ मृदुंग, ढोल-पथकांच्या गजरात, हातात भगवे झेंडे घेऊन भव्य अशी शोभयात्रा निघाली होती. या वेळी छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडात बांधलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. शेवटी येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत भंडारा उधळण्यात आला. याप्रसंगी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष सरिता चौधरी, उपाध्यक्ष पूजा जाधव, कार्यवाह प्रमोद नाटेकर, सहकार्यवाह कृष्णा पाटील, कोषाध्यक्ष नीलेश पाताडे, सहकोषाध्यक्ष रूपाली लठ्ठे, सदस्य राजेंद्र कुलकर्णी, श्रीकांत कर्वे, वृंदा पटवर्धन, कुसुम रोहिदास; तसेच समन्वय सल्लागार समितीचे बळीराम साबे, रत्नाकर चांदसकर, मोहन कुलकर्णी, बाळा माने, धनंजय गुरव, संध्याताई म्हात्रे, इंदूताई पाताडे, पौर्णिमा जावळे, उज्वला कबरे, अनुराधा जुवेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांकडून सादरीकरण तलवारबाजी, दांडपट्टा
दरवर्षीप्रमाणे लिवे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत सहभाग घेत तलवारबाजी, दांडपट्टा असे उपक्रम सादर केले. रोज हे प्रकार शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले जातात. ते शिकण्यासाठी विद्यार्थीही खूप मेहनत घेतात. दरम्यान, नवीन पिढीला दांडपट्टा; तसेच तलवारबाजी याची माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम शाळेत राबवले जातो. आज शोभायात्रेत अनेक शाळा उपस्थित असून, सगळ्या शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनीही हिरीरीने भाग घेतला, असे कौतुक लिवे शाळेचे विज्ञान शिक्षक नीलेश घाडगे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.