फेरिवाल्‍यांकडून १२ महिन्यांत ४.२३ कोटींचा दंड वसूल

फेरिवाल्‍यांकडून १२ महिन्यांत  ४.२३ कोटींचा  दंड वसूल
Published on

फेरीवाल्‍यांकडून १२ महिन्यांत ४.२३ कोटींचा दंड वसूल
मध्य रेल्‍वेच्या हद्दीत सुरक्षा दलाची कारवाई
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर फेरीवाल्‍यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) धडक कारवाई करत तब्बल ३७ हजार ८२३ जणांना अटक केली आहे. या मोहिमेत चार कोटी २३ लाख ९४ हजार ७१ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १२ महिन्यांत धावत्या गाड्यांमध्ये आणि रेल्वे परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागांत हा व्यापक तपास करण्यात आला.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या कालावधीत आरपीएफने एकूण ३७ हजार ९२० प्रकरणे नोंदवली. रेल्वेस्थानकांवर आणि गाड्यांमध्ये विनापरवाना व्यवसाय करणारे हॉकर्स प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण करतात. काही वेळा त्यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आरपीएफने कठोर पावले उचलत या अवैध हॉकर्सवर कारवाईचा धडाका लावला आहे.
रेल्वे सुरक्षा दल आणि प्रशासन पुढील काळात फेरीवाल्‍यांविरोधात मोहीम आणखी तीव्र करणार आहे. बेकायदेशीर फेरीवाल्‍यांना रेल्वे परिसरातून कायमचे हद्दपार करण्यासाठी विशेष कृती योजना आखण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रवाशांनीही सहकार्य करावे आणि बेकायदेशीर हॉकर्सविषयी तक्रारी तत्काळ नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांनीही अधिकृत तिकिटांद्वारे प्रवास करावा आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अधिकृत विक्रेत्यांना प्राधान्य
रेल्वेस्थानकांवर अधिकृत विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचे धोरण रेल्वे प्रशासनाने स्वीकारले आहे. प्रवाशांनी अधिकृत स्टॉलमधूनच खाद्यपदार्थ व अन्य वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कठोर उपाययोजनांची गरज
मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेस आणि लोकल गाड्यांमध्ये अधिकृत फेरीवाले नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यामुळे महसूल वाढेल आणि बेकायदेशीर हॉकर्स कमी होतील, अशी अपेक्षा होती, मात्र हा निर्णय अमलात येऊनही बेकायदेशीर हॉकर्सची संख्या कमी झालेली नाही. अनेक गाड्यांमध्ये अजूनही विनापरवाना विक्रेते प्रवेश मिळवून व्यवसाय करत आहेत. प्रवाशांच्या तक्रारीनुसार, हे हॉकर्स प्रवासादरम्यान गोंधळ घालतात आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com