लवकरच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

लवकरच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

Published on

लवकरच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन
उत्तर भारत देवभूमीची यात्रा; १७ एप्रिलला पुणे, कर्जत, वसईमार्गे होणार प्रस्थान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालविण्यात येणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांतर्गत ही विशेष ट्रेन उत्तर भारतातील पवित्र धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारी असणार आहे. या विशेष तीर्थयात्रा ट्रेनमुळे प्रवाशांना एकाच प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, वैष्णो देवी, कटरा, मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या ठिकाणांची यात्रा करण्याची संधी मिळणार आहे.
ही विशेष ट्रेन १७ एप्रिल २०२५ रोजी पुणे स्थानकावरून सुटेल. याशिवाय पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-भेस्तान (सुरत)-वडोदरा या स्थानकांवरून प्रवासी चढू किंवा उतरू शकणार आहेत. ७५० पर्यटक या ट्रेनमधून प्रवास करू शकतील. हा नऊ रात्री १० दिवसांचा प्रवास असणार असून, तब्बल पाच हजार किमी अंतर ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन एसी, नॉन एसी असणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी विशेष सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आलेली आहे. एसी, नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये मुक्काम, सकाळी चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा-कॉफी आणि रात्रीचे जेवण (शाकाहारी), एसी, नॉन एसी वाहनांद्वारे स्थानांतरण व पर्यटन, संपूर्ण प्रवासासाठी विमा कव्हर आणि आयआरसीटीसीच्या टूर मॅनेजरकडून मार्गदर्शन आदींचा समावेश असणार आहे.  ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक तीर्थयात्रेचा अनोखा अनुभव देणार आहे.  
---------
टूर पॅकेजचे दर
- इकॉनॉमी क्लास (स्लीपर) - १८,२३० रु
- कम्फर्ट क्लास (३एसी) - ३३,८८० रु.
- कम्फर्ट क्लास (२एसी) - ४१,५३० रु.
------------
अशी होणार बुकिंग
भारतीय रेल्वेने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनांना बळकटी देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही अभिनव संकल्पना साकारली आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी ८२८७९३१८८६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
.......................
गंतव्य आणि स्थळदर्शन
हरिद्वार - हर की पौडी, गंगा आरती, ऋषिकेश
अमृतसर - सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर
कटरा - माता वैष्णो देवी मंदिर
मथुरा-वृंदावन - श्रीकृष्ण जन्मभूमी
आग्रा - ताजमहाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com