महापारेषण कंपनीच्या सबस्टेशनला आग

महापारेषण कंपनीच्या 
सबस्टेशनला आग
Published on

महापारेषण कंपनीच्या
सबस्टेशनला आग
रोहा, ता. ४ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील कानसई येथील ४०० केव्ही क्षमता असलेल्या महापारेषण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये बुधवारी (ता. २) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. बाजूला असलेल्या ऑइलमुळे भडका उडून काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेनंतर या परिसरातील वीजपुरवठा काहीवेळ खंडित करण्यात आला होता. या आग दुर्घटनेत वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सबस्टेशनसमोर प्राथमिक शाळा असून, आजूबाजूला असलेल्या सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने आग झपाट्याने पसरली. अखेर जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com