सिडको दोन वर्षात ३ हजार २५१ कोटींची घरे बांधणार

सिडको दोन वर्षात ३ हजार २५१ कोटींची घरे बांधणार
Published on

सिडको दोन वर्षांत ३,२५१ कोटींची घरे बांधणार

२०२५-२६ साठी १४,१३० कोटींचा अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : दोन वर्षांत सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल तीन हजार २५१ कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २८ मार्च २०२५ रोजी सिडकोचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी आणि पाणीपुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी तरतूद असलेला २०२५-२६ साठी १४,१३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

सिडकोने तयार केलेल्या २६ हजार घरांची लॉटरी काढलेली आहे, तर आगामी काळात आणखीन २५ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. सर्वांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सिडकोचे सुमारे एक लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सिडकोने नियोजन करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. सिडकोने वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करून भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट ठेवले आहे. नगरविकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण म्हणून ५५ वर्षांच्या वाटचालीत सिडकोने नवी मुंबईसह सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळाव्यात याकरिता ई-प्रशासनाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य केले आहे.

अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र), इंटरनॅशनल एज्युसिटी, मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, उलवे कोस्टल रोड, खारघर-तुर्भे लिंक रोड, रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि नवीन शहर प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांसाठी १४,१२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत सिडकोने अनेक आव्हाने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ साठी सर्वाधिक १४,१२० कोटी (खर्च) व १४,१३० कोटी रुपयांचा (जमा) अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, उत्तम लेखांकन प्रथा आणि कामगिरी या तत्त्वांद्वारे राज्याची आणि महामंडळाची प्रगती साध्य करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट स्पष्ट होत आहे.
——————————————-
दृष्‍टिक्षेपातील अर्थसंकल्प २०२५-२६


प्रकल्प : तरतूद (कोटी रुपयांत)

सामान्य योजना : ६,८६८.४६

गृहनिर्माण : ३,२५१.३८

मेट्रो : ६२५.४८

पाणीपुरवठा : ११२०.५०

रेल्वे : ५६३.६३

नैना : ५२७.१३

७. नवी शहरे रु. १०७३.४२

एकूण रु. १४,१२०

——————————————————
कोट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी, महागृहनिर्माण योजना इत्यादी सिडकोचे प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या प्रकल्पांसोबतच नवी मुंबईतील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या इतर योजना जसे की कनेक्टिव्हिटी आणि पाणीपुरवठा इत्यादीसाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४ हजार १२० कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com