

मध्य रेल्वेवर आणखी ९८ उन्हाळी विशेष
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव/कानपूर, पुणे-झांसी आणि कलबुर्गी-बंगळुरू यादरम्यान ९८ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-सांकराईल यादरम्यान सहा अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या १,१५६ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११०३/०४ लोकमान्य टिळक टर्मिनस -मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण १० फेऱ्या असणार आहेत. त्या ६ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान धावणार आहे. ट्रेन क्रमांक ०४१५२/५१ लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेनच्या २४ फेऱ्या असणार आहेत. या गाड्या ११ एप्रिल ते २८ जूनपर्यंत धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१९२१/२२ पुणे-झांसी-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेनच्या २४ फेऱ्या असणार आहेत. या गाड्या ९ एप्रिल ते २६ जून यादरम्यान धावणार आहेत. याशिवाय हडपसर-झांसी-हडपसर साप्ताहिक अतिजलद विशेष २६ फेऱ्या आणि कलबुर्गी-सर एम विश्वेश्र्वराय टर्मिनल बंगळुरू साप्ताहिक विशेष ट्रेनच्या आठ फेऱ्या अशा एकूण ९८ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्यांचे आरक्षण ५ एप्रिलपासून सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.