

मेटल तुकड्यामुळे मध्य रेल्वे विस्कळित
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेच्या आटगाव ते तानशेत स्थानकादरम्यान अप मार्गावरील ओव्हरहेड वायरवर मेटलचा तुकडा आढळल्याने काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली. यामुळे कसारा-सीएसएमटी लोकलसेवा प्रभावित झाली असून, प्रवाशांचे हाल झाले. शुक्रवारी (ता. ४) दुपारी २.२० वाजता हा तुकडा ओव्हरहेड वायरवर दिसून आला. प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेसेवा तत्काळ थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचले आणि ओव्हरहेड वायरची तपासणी केली. वायर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २.४२ वाजता रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे तब्बल २२ मिनिटे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रखडल्या. परिणामी, लोकलसेवा विस्कळित होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.