

कळव्यात संतांच्या पादुका दर्शन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : कळव्यात पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज आणि रामनवमीनिमित्त प्रभू श्री राम सेतू शिळा दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. ५) ते रविवार (ता. ६) या कालावधीत हा सोहळा सुनील धुमारे फार्म, २० फिट रोड, पारसिक नगर येथे पार पडणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी विश्व परिवार आणि अभिजित पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ५) शंकर महाराज दुर्गाष्टमी आणि रविवारी (ता. ६) रामनवमीनिमित्त प्रभू श्री राम सेतू शिळा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यादरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांनी, श्रीमती सुंदराबाई काडगावकर (चिंचवड पुणे) यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चर्म पादुकांचे दर्शन, सच्चिदानंद सद्गुरू श्री देवेंद्रनाथ गुरू श्री कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने नाथपंथीय शाबरी यज्ञ आणि विद्यावाचस्पती डॉ. राधिका पारसनिस गुप्ते यांचे नाथ सांप्रदाय विषयावर प्रवचन, श्री साई बाबांनी, परमभक्त शामाजी यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक वस्तूंचे दर्शन, रविवारी (ता. ६) दर्शन सोहळा, सायंकाळी भजन आणि महाप्रसाद असणार असल्याची माहिती आयोजक स्वामी विश्व परिवार आणि अभिजित पवार मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.