

माणगावातून राष्ट्रीय जलतरणपटू तयार होतील
दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा विश्वास
माणगाव, ता. १० (बातमीदार) ः माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे आणि तानाजी दळवी यांच्या सहकार्याने ऑलिंपिकच्या धर्तीवर अत्याधुनिक जलतरण तलाव लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात या शहरातील जलतरणपटू राष्ट्रीय स्तरावर चमकतील आणि माणगावचा नावलौकिक सातासमुद्रापार करतील, असा विश्वास दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला. ते माणगाव येथील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रस्तावित तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.
हे स्विमिंग पूल शाळेतील विद्यार्थी तसेच माणगावमधील जलतरणपटू यांनादेखील उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा जलतरण तलाव जवळपास कोठेही नसल्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार संजय कदम यांनी केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी सांगितले, की मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच जलतरण तलाव लवकरच उपलब्ध करून देत आहोत. ही शाळा येत्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणार आहोत. या जलतरण तलावामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून इतरही खेळांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्यात येणार आहे. येथील जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर जलतरणपटू अभिनंदन दळवी प्रशिक्षण देणार आहे. याचबरोबर या वर्षी नर्सिंग कॉलेज सुरू करणार आहोत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी दिली. या वेळी माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, नगरसेवक सचिन बोंबले, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, सर्व नगरसेवक, अशोक दादा साबळे स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि जलतरणपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.