

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर पालिकेने २०२३ साली अमृत २.० अंतर्गत १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाच्या विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू केला होता. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर शहरात कामे सुरू झाली आहेत; मात्र निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे विद्यार्थीसेनेकडून पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेने अमृत २.० अंतर्गत १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. तांत्रिक मान्यता देण्यापासून, निविदा जाहिरात काढणे, निविदा कागदपत्र छाननी, निविदेतील नियम, शर्तीची पूर्तता करून घेणे, वाटाघाटी करणे, निविदा लिफाफा उघडणे तसेच आर्थिक तरतुदीच्या सुविधेसह पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, रचना, अंमलबजावणी करणे, पाणीपुरवठा योजनांबाबत शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शनाची जबाबदारी होती. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसे विद्यार्थीसेनेचे उपाध्यक्ष संतोष साळवी यांनी केला आहे.
------------------------------------------------
ठेका रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तांत्रिक मान्यता देताना निविदा प्रक्रिया राबवली आहे. तसेच भिवंडी महापालिका आणि संबंधित कंपनी यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला आहे. तसेच शासन नियमाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरली गेली नसल्याने ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.