नागरिकांशी पोलिसांचा थेट संवाद

नागरिकांशी पोलिसांचा थेट संवाद
Published on

मुरबाड, ता. ९ (वार्ताहर)ः ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलिस ठाणेअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. या माध्यमातून कायदेशीर अधिकारांबाबत पोलिस नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
लैंगिक शोषण, सायबर क्राइम, घरगुती हिंसा, साखळी चोरीचे प्रकार सध्या वाढत आहेत. या विषयांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी टोकावडे पोलिस ठाणेअंतर्गत तळवळी बारागाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच संपर्क नंबरचा वापर करून तत्काळ मदत मिळवू शकता, असेही उपस्थितांना सांगितले. या वेळी टोकावडे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजीव साकरे, पोलिस नायक अहिरे उपस्थित होते.
---------------------------------------------------
चित्रफीतीच्या माध्यमातून मार्गदर्शन
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी चांगला उपयोग होत आहे. याच अनुषंगाने चित्रफीतीच्या माध्यमातून संवाद साधला जात असल्याचे टोकावडे परिसरातील गावातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर चकोर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com