म्‍हसळ्यात उद्या धावीर देवाचा उत्‍सव

म्‍हसळ्यात उद्या धावीर देवाचा उत्‍सव
Published on

म्हसळा, ता. ९ (बातमीदार) ः म्हसळ्याचे जागृत दैवत श्री धावीर महाराज यांची यात्रा शुक्रवारी (ता. ११) होत आहे. या यात्रेपासून तालुक्यातील इतर यात्रांना सुरुवात होते. तालुक्यातील ८४ गावांतील भाविक मोठ्या भक्‍तिभावाने आणि उत्‍साहात यात्रेत सहभागी होतात. यावर्षी श्री धावीर महाराज पालखीस सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड पोलिस दलातर्फे बँड पथकासह मानवनंदना (सलामी) देण्यात येणार आहे.
पूर्वी तालुक्यातील ३५ ते ४० गावांतून मानाच्या काठ्या यायच्या, मात्र आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे. काही वर्षांपासून केवळ १५ गावांतील काठ्या यात्रेत सहभागी होतात. आलेल्या सर्व काठ्यांचा ग्रामस्‍थांकडून सत्कार करण्यात येतो. केलटे गावातील काठीचा पूर्वापार प्रथम सन्मान करण्याची परंपरा आजही कायम आहे.
यात्रेसाठी म्‍हसळा नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरातील चौका-चौकांत पथदिवे, हॅलोजन लावले जातात. शहरात साफसफाई केली जाते. ग्रामदैवत श्री धावीर महाराजासंह रवळनाथ, अवळनाथ, बापूजी, जोगेश्वरी, भैरी आणि काळेश्री अशा देवदेवतांसमवेत पालखी रात्रभर घरोघरी फिरते. यात्रेदरम्‍यान म्हसळा पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्‍त ठेवला जातो.


....................

चैत्र पौर्णिमेला मंदिरात उत्सव
रेवदंडा, ता. ९ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील चौल-तुलाडदेवीमधील धावीर देवस्थानात पौर्णिमेनिमित्त‍ शनिवारी (ता. १२) वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सायंकाळी होणाऱ्या लाट फिरवण्याच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक आवर्जून उपस्‍थित राहतात. यंदा थेरोंडा-हनुमान वाडीतील श्री सुवर्ण हनुमान मंदिरात जय हनुमान ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी पालखी सोहळा मिरवणुकीने उत्सवाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com