

देवीचापाडा येथील तलावातील मासे मृत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : पश्चिमेतील देवीचापाडा येथील स्मशानभूमी मागील बाजूस तलाव आहे. या तलावातील मासे मृत पावले आहेत. येथील पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर हे मंगळवारी (ता. ८) सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना तलावाच्या पाण्यावर मृत मासे तरंगत असल्याचे दिसून आले.
देवीचापाडा येथील पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी देवीचापाडा खाडीकिनारा भागात फिरण्यासाठी गेले होते. देवीचापाडा जेटी, सातपूल, स्मशानभूमी परिसरातून फेरफटका मारत असताना स्मशानभूमीमागील तलावात त्यांना मासे तरंगताना आढळले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर तलावात शेकडो मासे मृत झाल्याचे आढळले. काही मासे पाण्यावर तरंगत होते. काही मासे पक्ष्यांनी तलावाच्या काठी आणून फडशा पाडला होता. या तलावात गोड्या पाण्यातील मासे असल्याने परिसरातील नागरिक अनेक वेळा या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी येतात. जुन्या काळातील या तलावाचे संवर्धन आणि तलावातील पाणी स्वच्छ राहील या दृष्टीने ग्रामस्थ या तलावाची विशेष काळजी घेतात. परिसरातील गाईगुरे, पशु-पक्ष्यांना हा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार आहे. या तलावातील शेकडो मासे मृत आढळून आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.