दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
Published on

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
वांद्रेतील घटना; पळून गेलेल्या आरोपीस अटक
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः दोन अल्पवयीन मुलींचा एका सराईत आरोपीने विनयभंग केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २० वर्षांच्या आरोपीस खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध जबरी चोरी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे आदी १५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
तक्रारदार वयोवृद्ध महिला वांद्रे येथे राहते. तिला ११ वर्षांची नात असून, तिच्यासह तिची १३ वर्षांची मैत्रीण असे तिघेही शुक्रवारी (ता. ४) वांद्रे येथील गार्डनजवळ आले होते. रात्री साडेआठ वाजता तिथे आरोपी आला आणि त्याने दोन्ही मुलींशी जवळीक साधून अश्लील चाळे करून विनयभंग केला होता. या प्रकारानंतर मुलींनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर खेरवाडी पोलिसात तक्रार करण्यात आली. विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना शनिवारी (ता. ५) पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. अटकेनंतर आरोपीला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com