खारघरमध्ये भरदिवसा घरफोडी

खारघरमध्ये भरदिवसा घरफोडी
Published on

खारघर, ता. ९ (बातमीदार) : भरदिवसा कडी-कोयंडा तोडून घरातील चार तोळे सोने, चांदी आणि ८० हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केल्याची घटना २ एप्रिलला दुपारी ३ च्या सुमारास खारघर सेक्टर १०मध्ये घडली.
खारघर सेक्टर १० कोपरगावमधील साई व्हीलामध्ये प्रवीणकुमार चौधरी (२८) राहतात. २ एप्रिलला किरणा मालाचे दुकान चालवणारे प्रवीणकुमार काही कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. दरम्यान, घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. चोरांनी त्यांच्या घरातील चार तोळे सोने, चांदी आणि ८० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. या घटनेची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चौधरी यांच्या घरात चोरी करतेवेळी चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत; मात्र अद्याप पोलिसांना त्यांचा शोध घेता आला नाही. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्ना खंडेलवाल करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी याच परिसरात चिकन सेंटरमध्ये अशाच प्रकारे चोरी झाली होती. त्या घटनेत ४० हजार रुपये आणि मोबाईल चोरीला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com