पाणी चोरांना दणका

पाणी चोरांना दणका
Published on

भिवंडी, ता.९ (बातमीदार): भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत सध्या पाणी चोरी रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत बेकायदा नळ जोडण्या तोडण्याची कारवाई सुरू असून पाणीपुरवठा विभागाने ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भिवंडी महापालिकेअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्स, सर्व्हिस सेंटर्स, टेक्सटाईल डाईंग, सायझिंग कंपन्यांच्या मालकांकडून महापालिकेच्या मुख्य पाणीपुरवठा वाहिनीला छिद्र पाडून पिण्याच्या पाण्याची चोरी होत असल्याने शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पालिका आयुक्त, प्रशासक आयुक्तांकडे विविध तक्रारी येत होत्या. ही बाब गांभीर्याने घेताना आयुक्तांनी पाणी चोरीला आळा घालण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता संदीप पटनवार यांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यांचे पथक तयार केले आहे. या पथकाची जबाबदारी लिपिक विराज भोईर यांना देण्यात आली असून शहरातील विविध भागांची पाहणी करून डाईंग, सायझिंग आणि निवासी इमारतींमध्ये सध्या पाहणी केली जात आहे. याच अनुषंगाने शहरात आत्तापर्यंत ९८ मोठ्या जलवाहिन्या तोडल्या आहेत. तर ३० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याने पाणी चोरांना चांगलाच दणका दिला आहे.
---------------------------------------------------------
दहा नळजोडण्या खंडित
महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक २ अंतर्गत नागाव येथील खान कंपाउंडमध्ये सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीवर महापालिकेने कोणताही कर आकारलेला नाही, तरीही विनापरवानगी दहा नळ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यावर तत्काळ कारवाई केली असून पाण्याचा पंप देखील जप्त केला आहे. तसेच भविष्यातही कारवाई अशीच सुरूच राहील, असे माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com