सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी

सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी
Published on

सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : सागाव-मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीच्या आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे.

डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रस्ते, उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार राजेश मोरे हेदेखील यासाठी सातत्याने आग्रही होते.

डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहेत. यामुळे ओघाने वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिक कोंडीत अडकून नयेत, यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी नव्या रस्ते आणि उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीतील सागाव - मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीचे आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत खासदार डॉ. शिंदे मागणी केली होती. तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार राजेश मोरे हेदेखील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आग्रही होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी निधी मंजूर केला आहे.

वाहतूक अधिक वेगवान होणार
सागाव-मानपाडा रस्त्यावरील सोनारपाडा जंक्शन हे अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या १.५ ते २ किमी अंतरावर हा चौक असल्याने या ठिकाणी शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. तसेच या ठिकाणी दोन शाळादेखील असल्याने शाळेच्या वेळेत बसमुळे काही अंशी वाहतूक कोंडीदेखील होते; मात्र या पुलाच्या उभारणीमुळे शहरातील स्टार कॉलनी, एमआयडीसी विभाग, गांधीनगर या भागात जाणारी वाहने पुलाखालून जातील. तर रेल्वे स्थानकाकडे जाणारी आणि स्थानकाहून येणारी वाहने उड्डाणपुलाच्या सहाय्याने येतील. यामुळे नागरिकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com