

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : वर्षभरापासून तुर्भे रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम काही तांत्रिक बाबींमुळे रखडले होते. आता नव्याने रचना करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी तब्बल ४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी दीड वर्षात खुला होणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तुर्भे येथील उड्डाणपुलाअभावी या ठिकाणी अनेक अपघात झाले होते व उड्डाणपुलाचे काम हाती घेतल्यानंतरही अपघात होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आजपर्यंत या ठिकाणी १० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; तर २०हून अधिक जण जखमी झाले असून, त्यातील काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याच उड्डाणपुलासाठी तुर्भेवासीयांनी अनेक आंदोलने केली होती. काही महिन्यांपूर्वी तर रास्ता रोकोदेखील करण्यात आला होता. उड्डाणपुलाचे काम मार्गी लागावे यासाठी नागरिकांकडून सह्यांची मोहीम, तसेच प्रशासनाकडे पत्रव्यवहारदेखील केला जात होता. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा पादचारी उड्डाणपूल करावा या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली आहेत.
---------------
वाहतुकीची कायम कोंडी
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या मार्गाच्या एका बाजूला आद्योगिक क्षेत्र; तर दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रातच स्थानकासमोर नवी मुंबईतील सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली तुर्भे स्टोअर ही झोपडपट्टी वसली आहे. या झोपडपट्टीत राहणारे लोक कामानिमित्त लोकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यामार्गावर कायम वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते.
-----------------
५०६ मीटर लांब, १७ मीटर रुंद पूल
उड्डाणपुलाची रुंदी १७ मीटर; तर लांबी ५०६ मीटर असणार आहे. दोन्ही बाजूंना दोन मार्गिका असणार आहेत. तसेच शहरातील इतर ठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलांना जसे रंगरगोटी करून सजवले आहे, त्याप्रमाणे याही उड्डाणपुलाखाली विद्युत रोषणाई केली जाणार आहे. येत्या १५ दिवसांत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ४० कोटी खर्च अपेक्षित आहे. एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेचे अभियंता सुभाष तुंगार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.