मुंब्र्यात मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची वीजचोरी उघडकीस,

मुंब्र्यात मीटरमध्ये फेरफार करून लाखोंची वीजचोरी उघडकीस,
Published on

मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी
कळवा (बातमीदार) : मुंब्र्यात टोरंट पॉवर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तपासणी करताना वीजमीटरमध्ये फेरफार करून लाखो रुपयांची चोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरी करणाऱ्या दोघांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोरंट पॉवर वीज कंपनीचे कर्मचारी सायली दाभाडे यांनी मुंब्रा डोंगरीनगर येथील मलिक रेसिडेन्सी येथे विद्युत पुरवठ्याची तपासणी केली. या वेळी सैफुल इस्लाम (वय ४३) व हिना कौसर (३८) यांनी वीज मीटरमध्ये फेरफार केला होता. तसेच ७,६९५ युनिट वापरून दोन लाख ३० हजारांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मुंब्रा पोलिसांनी या दोघा आरोपींवर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com