

जव्हार, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच तहसील कार्यालयातील बैठक हॉल येथे तहसीलदार लता धोत्रे यांनी जाहीर केली. २४ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जव्हार तालुका हा पेसा क्षेत्रात येत असल्याने ४८ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी आकरे, आपटाळे, आयरे, भूरी टेक, दाभलोन, दस कोड, देहरे, डेंगाची मेट, ढाढरी, धानोशी, हातेरी, जुनी जव्हार, कासट वाडी, केळघर, कोरतड, नांदगाव, ओझर, पाथर्डी, पिंपळशेत, सारसून, तलासरी, वाळवंडा, वावर, झाप या २४ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
२०२० ते २०२५ या वर्षामध्ये २४ ग्रामपंचायती या महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव होत्या. त्या आता २०२५-२०३० या वर्षामध्ये सर्वसामान्य अनुसूचित जमातीसाठी राखीव राहतील. त्या ग्रामपंचायती घिवंडा, विनवळ, वडोली, हिरडपाडा, गोरठण, खडखड, चांभारशेत, तिलोंडा, रायतळे, साखरशेत, न्याहाळे खुर्द, ऐना, दाभेरी, साकुर, कोगदा, न्याहाळे बुद्रुक, बोराळे, चौक, दाभोसा, कायरी, किरमिरा, कौलाळे, शिरोशी, रुईघर आहेत. सरपंचपदासाठी महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव व सर्वसामान्य अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायती तहसीलदारांनी वाचून दाखवून आरक्षण घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.