अनिकेत म्हात्रे युवासेना जिल्हाप्रमुखपदी

अनिकेत म्हात्रे युवासेना जिल्हाप्रमुखपदी
Published on

वाशी, ता. ९ (बातमीदार) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील युवापिढीला ठोस दिशा देण्यासाठी शिवसेना पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुखपदी अनिकेत रमाकांत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिकेत म्हात्रे यांच्याकडे या नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले असून, या वेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
युवासेना जिल्हाप्रमुख पदाची मला मिळालेली संधी ही सन्मानासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिकांना पाणीटंचाई, आरोग्याच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, वाहतूक व रस्त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त व्हावे लागत आहे. एक सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची प्रतिमा प्रत्यक्षात मात्र असमाधानकारक आहे. या प्रश्नांची दखल घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून ठोस कार्यवाही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अनिकेत्र म्हात्रे यांनी सांगितले. ‘युवासेना आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधणार असून, त्यांच्या समस्या समजून घेऊन तत्काळ उपाययोजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com