

मुंबई विद्यापीठात आज महिला कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन
मुंबई, ता. ९ : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता प्रांगणात गुरुवारी (ता. १०) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महिला कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते ११ एप्रिल असे दोन दिवस चालणाऱ्या या महिला कौशल्य विकास मेळाव्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुंबई विद्यापीठ व महापालिका नोंदणीकृत महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरण व आर्थिक स्वालंबनासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. या व्यापक दृष्टिकोनातून आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व नवोपक्रम नवसंशोधन, साहचर्य विभागाच्या संयुक्त उपक्रमातून या वर्षी बचत गटांतील महिलांना विशेष संधी देण्याच्या प्रयत्नातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ५० बचत गट सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.