

विक्रमी मालमत्ता कराचे संकलन केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये सहा हजार १९८ कोटी पाच लाख रुपये इतक्या रकमेचे मालमत्ता करसंकलन करण्यात आले आहे. ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. त्याबद्दल करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालिका मुख्यालयात बुधवारी (ता. ९) हा छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये सहाय्यक करनिर्धारक व संकलक विवेक राऊळ, अनुप्रिया जाधव, हृदयनाथ गोसावी, राजू काठे, महेश साळगावकर, अशोक नाईक, दत्तात्रय गिरी, उमाकांत वैष्णव, प्रसाद पेडणेकर, अनिल साळगावकर, सूर्यकांत गवळी, दीपक गायकवाड, धर्मेंद्र लोहार, संतोष ठाकूर, दिलीपकुमार साळुंखे यांचा समावेश होता. याशिवाय अन्य नऊ सहाय्यक करनिर्धारक व संकलकांनादेखील प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.