एसआरएत भटक्या कुत्र्यांची दहशत

एसआरएत भटक्या कुत्र्यांची दहशत
Published on

एसआरएत भटक्या कुत्र्यांची दहशत
अभ्यागत, कर्मचाऱ्यांना चावण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून चावा घेण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याची दखल घेत एसआरए प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेच्या श्वान पथकाला पाचारण केले, पण त्याचा अंदाज आल्याने सर्वच कुत्र्यांनी काढता पाय घेतल्याने श्वान पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
एसआरए कार्यालयात दररोज चार ते पाच हजारांहून अधिक नागरिक येतात. त्यामुळे कार्यालयाच्या गेटपासून सर्वच मजल्यांवर अभ्यागतांची गर्दी असते. दरम्यान, कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यामुळे सुरक्षा रक्षक सातत्याने त्यांना हाकलून लावतात, मात्र त्यांचा वावर कमी होत नसल्याने आणि अभ्यागतांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला होता. भरदुपारी पालिकेचे श्वान पथक बोलवले होते, मात्र तासभर सर्वत्र शोधाशोध करूनही श्वान न सापडल्याने पथक रिकाम्या हाती परतले. दरम्यान, सदरचे पथक आल्याचा सुगावा लागल्याने त्यांनी पळ काढला असावा, अशी चर्चा दिवसभर एसआरए कार्यालयात सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com