

नेरूळ, ता. १० (बातमीदार) : सानपाडा सेक्टर पाच येथील गावदेवी मैदानात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त क्रिकेट चषक २०२५ आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये १८पेक्षा अधिक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. रक्तदान शिबिरात १०२ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला होता. महिलांच्या पथकाने पारंपरिक पद्धतीने लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. या वेळी मागील १३ वर्षांमध्ये ४६ वेळा रक्तदान करणारे समाजसेवक नीलेश कचरे यांचा अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंग राजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त लक्ष्मण व्हटकर, समता परिषदेच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहा सोनकाटे, महादेव अर्जुन, राजू कोकरे, सतीश कोळेकर आदी उपस्थित होते. सुभाषराव येळे, नामदेव मोरे, गणेश थोरात व संजय शेडगे आदींनी या उपक्रमाचे आयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.