कासार्डे-तर्फेवाडी मुंबई मंडळाची रविवारी सभा

कासार्डे-तर्फेवाडी मुंबई मंडळाची रविवारी सभा
Published on

कासार्डे-तर्फेवाडी मुंबई मंडळाची रविवारी सभा
जोगेश्‍वरी, ता. १० (बातमीदार) ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर्फेवाडीतील मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची सार्वजनिक सभा रविवारी (ता. १३) शिरोडकर हायस्‍कूल, डॉ. बोर्जेस रोड, परळ येथे सायंकाळी ४ ते ८ या वेळेत होणार आहे. या सभेमध्ये कणकवली येथील कासार्डे तर्फेवाडीतील जागृत महापुरुषांच्या पिंपळेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आतापर्यंत झालेल्‍या जमाखर्चाबाबत तळेबंद सादर करण्‍यात येणार आहे. मे महिन्‍यात होणाऱ्या वार्षिक महोत्‍सवाचे नियोजनही करण्‍यात येणार आहे. तसचे इतर महत्त्वाचे निर्णय घेण्‍यात येणार आहेत. नव्‍याने स्‍थापन झालेली कार्यकारिणी व त्‍यातील सभासदांनी, तर्फेवाडीतील मुंबईस्थित समस्त ग्रामस्थांनी (चाकरमानी) मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे सचिव शेखर तर्फे व खजिनदार किशोर पाळेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com