खारघरमध्ये उद्या हनुमान जयंती उत्सव

खारघरमध्ये उद्या हनुमान जयंती उत्सव
Published on

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर शहर आणि परिसरातील गावांत हनुमान जयंती उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, अभंगवाणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खारघर सेक्टर ११मधील जय हनुमान आणि श्री शनेश्वर मंदिरात शनिवारी (ता. १२) पहाटे अभिषेक व पूजा, हनुमान जन्मोत्सव, दुपारी बारा वाजता सुंदरकांड; तर सायंकाळी चार वाजता श्रीराम महिला मंडळ हरिपाठ सादर करणार आहेत. सायंकाळी सात वाजता भक्ती सरगम कार्यक्रम, तसेच सायंकाळी साडेसहानंतर महाप्रसाद पार पडणार आहे. खारघर गाव ग्रामस्थ मंडळ, मुर्बी ग्रामस्थ मंडळ, तसेच कोपरा, बेलपाडा, रांजणपाडा, पेठ, खुटूक बांधन, ओवे पेठ आदी गावांत पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक, हनुमान चालीसा पठण, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे. भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ आणि शनी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com