

मूठभर बदाम पूर्ण करतील शरीरातील प्रथिनांची गरज
दररोज २३ बदाम खाण्याची तज्ज्ज्ञांची शिफारस
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत बदाम शरीरासाठी फायदेशीर आणि गुणकारी ठरतात. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने मोडेस्टो (यूएसए)ला भेट दिली असता कॅलिफोर्निया आलमंड संस्थेच्या महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी बदामांचे शारीरिक आणि मानसिक फायदे अधोरेखित केले.
भारतीय आयुर्वेदातही बदामाच्या फायद्यांचा उल्लेख केला आहे. बदामाचा प्रमुख फायदा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही होतो. शारीरिक फायदे आणि बदामांचे सेवन यांचा फार जवळचा संबंध आहे. बदाम खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी होण्यास मदत होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉल (एचडीएल) ची पातळी राखण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
दररोज मूठभर (सुमारे २३ बदाम) खाण्याची शिफारस या वेळी तज्ज्ञांनी केली. भारतात शतकानुशतके शक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी बदाम हा एकमेव पदार्थ आहे. त्यामुळे मूठभर बदाम खाणे आवश्यक आहे.
कॅलिफोर्निया आलमंड बोर्डच्या न्यूट्रिशन रिसर्च प्रोगामच्या प्रमुख एलिना हेमलर यांनी कॅलिफोर्निया बदामांचे महत्त्व स्पष्ट केले.
झोप, मानसिक आरोग्य, रोगप्रतिकारकशक्ती, त्वचा, पोषकतत्वे, कर्करोग, ॲलर्जी प्रतिबंधात्मक उपचार, हृदयावरही बदामाच्या फायद्यांवर संशोधन केले जात आहे. बदामाने वजनही नियंत्रणात राहते. प्रिडायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी जेवणापूर्वी बदाम खाल्ल्यास डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते.
- एलिना हेमलर,
प्रमुख, कॅलिफोर्निया आलमंड बोर्ड न्यूट्रिशन रिसर्च प्रोग्राम
सालीसकट, सालीशिवाय खाऊ शकता
बदाम सालीसकट किंवा सालीशिवाय खाल्ले जाऊ शकतात. संशोधनात आढळले की, भिजवलेले बदाम पचायला सोपे असतात आणि त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्व शरीराद्वारे चांगले शोषले जातात. रात्रभर बदाम भिजवून सकाळी साल काढून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि चांगले पोषण मिळते.
बदाम खाण्याची योग्य पद्धत
कॅलिफोर्निया आलमंड बोर्डने आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे की, बदाम खाण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी या दौऱ्यादरम्यान स्पष्ट केले.
* भाजलेले बदाम - कॅलिफोर्निया आलमंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, भाजलेल्या बदामामध्ये पोषण अबाधित राहते. हलके भाजलेले बदाम स्नॅक्स म्हणून खाल्ले जाऊ शकतात, ज्यामुळे ते उर्जेचा एक चांगला स्रोत बनते.
* बदाम पावडर किंवा पेस्ट - बदाम बारीक करून पावडर किंवा पेस्टच्या स्वरूपात वापरणेदेखील फायदेशीर आहे. ते दूध, स्मूदी किंवा खिचडीत मिक्स करून खाता येऊ शकतात.
* सॅलड आणि इतर पदार्थांमध्ये मिसळणे- बदाम सॅलड, ओट्स, दही, खिचडीचा पदार्ख किंवा इतर आरोग्यदायी पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.
* बदाम बटर-ब्रेड, चपाती किंवा स्मूदीमध्ये बदाम बटर घालून मिक्स करून खाता येऊ शकतो. स्नायूंची ताकद आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. बदाम डार्क चॉकलेटसोबत स्नॅक म्हणून खाऊ शकतो. ते चव आणि पोषणाची भर देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.