मुरबाडमध्ये रोजगाराची हमी

मुरबाडमध्ये रोजगाराची हमी
Published on

मुरबाड ता. १० (वार्ताहर)ः मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत पंचायत समिती मुरबाडमार्फत जवळपास १,५७४ कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत सिंचन विहिरी, फळबाग लागवड, गोठा, पोल्ट्री शेड, घरकुल, रस्ते अशी २६५ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ५१७२ मजूर उपस्थित होते. २०२५ च्या शासन निर्णयानुसार सध्या मजुरीचा दर ३१२ रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी हाच दर २९७ रुपये एवढा होता. त्यामुळे यंदा शासनाने फक्त १५ रुपये मजुरीच्या दरात वाढ केली आहे. या योजनेमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे, पण तीन महिन्यांपासून मजुरांच्या खात्यात पेमेंट जमा होत नसल्याची खंत वाघिवलीतील बबन विशे यांनी व्यक्त केली.
--------------------------------------
मजुरीचा दर परवडेना
मुरबाड तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत, पण शासनाचा मजुरीचा दर कमी असल्याने शासकीय मजुरीचा दर किमान पाचशे रुपये वाढवावा, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे. याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे मुरबाड पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com