सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात
Published on

सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात
मुंबई, ता. १० ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. ८) डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले.
याप्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव बोधनकर, प्रा. डॉ. यशोधरा वराळे, उपप्राचार्य बी. एस. पाटील, पर्यवेक्षक ए. डी. वानखेडे आणि प्रमुख पाहुणे तसेच वरिष्ठ माध्यम सल्लागार शैलेश कसबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. जी. कोकाटे यांनी केले, तर आयोजनाची जबाबदारी आर. टी. मोरे यांनी पार पाडली. सामाजिक समता सप्ताहांतर्गत १४ एप्रिलपर्यंत विविध उपक्रम पार पडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com