

पालघर, ता. १० (बातमीदार) : तारापूर एमआयडीसीची स्थापना होऊन ५० वर्षे झाली. आशियामधील सर्वात मोठी एमआयडीसी असूनही आतापर्यंत कामगार विमा रुग्णालय नाही, मात्र राज्य सरकारने या समस्येची दखल घेऊन एक रुपया नाममात्र शुल्क आकारून एमआयडीसीच्या परिसरातील कुंभवली येथील पाच एकर जागा मंजूर करून १५० खाटांच्या कामगार विमा रुग्णालयाला मान्यता दिली.
तारापूर एमआयडीसीमधील कुंभवली येथील सर्व्हे क्र. १७७५/५७ या जागेवर कामगार विमा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी लागणारी जमीन एक रुपया नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्यास बुधवारी (ता. ९) मान्यता देण्यात आली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीत बैठकीत खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, तसेच विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी व इतर प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी रुग्णालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत प्रस्तावित कामगार विमा रुग्णालयासाठी कुंभवली येथील जमीन हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा झाली. या वेळी संबंधित विभागांनी रुग्णालयासाठी आवश्यक ती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयामध्ये कामगारांव्यतिरिक्त ३० टक्के जागा अन्य रुग्णांना राखीव राहतील.
खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा हे गेल्या १० महिन्यांपासून, तर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णालयासाठी पाठपुरावा करत होते. सवरा यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील कामगारांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.