अंबरनाथ ग्रामीण भागाचा प्रवास होणार सुकर

अंबरनाथ ग्रामीण भागाचा प्रवास होणार सुकर
Published on

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामीण भागाचे रस्तेही यापुढे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. ग्रामीण भागातील कच्चे रस्ते, त्यांची दुरवस्था यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामारे जावे लागत होते. मात्र, आता या रस्त्यांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने येथील प्रवास सुकर होणार आहे. त्याअंतर्गत सहा रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
शहरातील वाहतूक आणि दळणवळण गतिमान करण्यासोबतच ग्रामीण भागातील वाहतूकही विनाअडथळा व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी तब्बल नऊ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सहा महत्त्वांच्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गतिमान वाहतुकीचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. उन्नत मार्ग, रेल्वे, मेट्रो रेल हे प्रकल्पही वेगाने प्रगतिपथावर आहेत. या मार्गांच्या उभारणीमुळे शहरातील वाहतूक गतिमान होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून सुखकर प्रवास करता येणार आहे. शहरी भागातील ही वाहतूक व्यवस्था अद्ययावत करत असतानाच खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्ते ही मजबूत केले जात आहेत.

या रस्त्यांचा समावेश
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील सहा महत्त्वांच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. एकूण नऊ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. नऊ कोटी ८९ लाख रुपये खर्चातून हे रस्त्याचे काम केले जाणार आहे. यात पुढील दोन वर्षे रस्त्यांची देखभाल दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली आहे. गोरपे ते मंगरूळ, कुंभार्ली जोड रस्ता, करवले-पोसरी ते काकडवाल रस्ता, करवले-नाऱ्हेण उत्तर शिव रस्ता, ढवळे ते कातकर वाडी रस्ता, ढोके ते दापिवली रस्ता अशा सहा रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com