कोपरखैरणे विभागात आयुक्तांकडून झाडाझडती

कोपरखैरणे विभागात आयुक्तांकडून झाडाझडती
Published on

कोपरखैरणे विभागात आयुक्तांकडून झाडाझडती
वाशी, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा राबविताना विविध कार्यालयांना भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नुकतेच त्‍यांनी कोपरखैरणे विभागाची झाडझडती घेतली.
या वेळी कोपरखैरणे विभाग कार्यालयाची पाहणी करत असताना जन्म- मृत्यू नोंदीविषयक कार्यालयीन दप्तराची पाहणी केली. ही प्रणाली नागरिकांना अधिक सोयीची होण्याच्या दृष्टीने विद्यमान डिजिटल प्रणालीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून नागरिकांना घरबसल्या नोंदणी करण्यासह घरीच प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्याचप्रकारे विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करून ज्याप्रमाणे पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे डिजिटली अपलोड करण्यात येतील. तसेच संबंधितांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचा दिनांक संदेशाद्वारे पाठविला जाईल, अशी प्रणाली राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. डेब्रिज परवानगी तसेच मैदाने वापर परवानगी यामध्येही सुधारणा करून सर्व यंत्रणा डिजिटली कराव्यात तसेच या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादीचा फलक तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावरही दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे सर्व प्रमाणपत्र वितरणविषयक बाबींची रजिस्टरमध्ये रितसर नोंद करून ठेवावी व विभाग अधिकाऱ्यांनी ते तपासून नियंत्रण ठेवावे, असेही निर्देश सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे यांना दिले. विभाग कार्यालय हद्दीतील संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था अशा सर्व खासगी बाबींच्याही नोंदी महापालिकेकडे ठेवाव्यात, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी कोपरखैरणे माता-बाल रुग्णालयाच्या कामाचीही पाहणी करून आवश्यक बदल सूचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com