भिवंडीत १,४४४ इमारती धोकादायक

भिवंडीत १,४४४ इमारती धोकादायक
Published on

भिवंडीत १,४४४ इमारती धोकादायक
रहिवाशांचा जीव टांगणीला
भिवंडी ता. १० (वार्ताहर) : धोकादायक इमारतींची समस्या प्रत्येक शहरात अधिक जटिल बनली आहे; मात्र अशा इमारती निर्मनुष्य करण्यात स्थानिक प्रशासनाला अनेकदा अपयश येत असल्याने या इमारतींच्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा लागत आहे; मात्र अशा परिस्थितीत या धोकादायक व अतिधोकादायक इमारतींत हजारो रहिवासी आपला जीव मुठीत धरून राहताना दिसत आहेत. भिवंडी महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात १,४४४ इमारती या धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत ९० हून अधिक जणांचा जीव गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत; मात्र पालिका प्रशासनाकडून याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही. त्याचा फायदा घेत थातूरमातूर दुरुस्ती व रंगरंगोटी करून धोकादायक इमारती तग धरून उभ्या आहेत.
मागील वर्षी शहरात पाच प्रभाग समितीअंतर्गत १,३११ इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. त्यामध्ये १३३ इमारतींची भर पडली आहे. ज्यामध्ये २८७ इमारती अतिधोकादायक आहे. यामध्ये रहिवाशी इमारतींसह कौलारू घरे, यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे.

पालिका क्षेत्र अतीधोकादायक सी १ श्रेणीतील इमारतींची संख्या २८९ आहे. तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी २ ए श्रेणीत ७३८, इमारतीमध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी २ बी श्रेणीत ३७२ तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी ३ श्रेणीत ४५ इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती शहर विकास अधिकारी अरविंद घुगरे यांनी दिली आहे.

मागील वर्षी अशा धोकादायक इमारतींपैकी ४९ इमारती निष्कासित केल्या, पण या तीन महिन्यांत अशा इमारती निष्कासित करण्याची कारवाई थंडावलेली आहे. यातील अतिधोकादायक क्षेत्रातील इमारतींची संख्या २८९ तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करणाऱ्या इमारतींची संख्या ७३८ अशी लक्षणीय आहे, परंतु यापैकी अनेक इमारतींमध्ये आजही शेकडो कुटुंबीय वास्तव्य करीत आहेत.

निर्मनुष्य करण्यात अडचणी
धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होणारी जीवितहानी टळावी, अशी अपेक्षा आहे; मात्र अशा इमारती निर्मनुष्य करण्यात सर्वात मोठा अडथळा स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळींचा येत आहे, तर अनेक इमारती अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीनमालक व पगडी पद्धतीने फ्लॅट्स घेतलेले कुटुंबीयांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com