

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः घराचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या हौसेने नवीन गृहप्रकल्पात पैसे गुंतवले; पण बँकांकडून कर्जच मिळत नसल्याने घराची नोंदणी रद्द करून गुंतवलेली रक्कम परत मिळावी, यासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली ठाण्यात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
ठाण्याच्या कोलशेत भागात एका बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन प्रकल्पात मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी घराची नोंदणी केली होती. नोंदणी करताना त्यांनी लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकाला दिले होते; परंतु त्यातील अनेक कुटुंबांना बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्याने पुढील व्यवहार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे घरांची नोंदणी रद्द करण्याची वेळ ओढावली होती. यासंदर्भात अनेकांनी व्यावसायिकाला सांगितले, पण कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने याप्रकरणी मनसेकडे मदत मागण्यात आली होती. मनसेच्या वतीनेही बांधकाम व्यावसायिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ग्राहकांनी भरलेले पैसे परत देण्यास विरोध केल्याने अखेर गुरुवारी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
------------------------------------------------
कष्टाच्या पैशांवर पाणी
या गृहप्रकल्पाला चार ते पाच वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीला ग्राहकांनी ५० हजार रुपये देऊन घरांची नोंदणी केली होती. काही कालावधीनंतर टप्प्याने तीन लाखांपर्यंतची रक्कम ग्राहकांनी भरली. त्या वेळी नोंदणी रद्द केल्यास पैसे परत मिळतील, अशी अपेक्षा ग्राहकांची होती. कष्टाने आणि उसनवारी करून जोडलेली रक्कम बुडण्याच्या मार्गावर असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.