

जिल्हा गुंतवणूक परिषदेत २,२०० कोटींचे करार
मध्यम, लघू उद्योगांना प्रोत्साहनाचे धोरण
तारापूर, ता. १० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास्तव नवीन गुंतवणूक आकर्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य उद्योग विभाग आणि पालघर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे बुधवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगांसमवेत जवळपास २,२०० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध क्षेत्रांतील १५८ उद्योगांसमवेत २,२०० कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आला. जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊन गुंतवणुकीबाबत सकारात्मक वातावरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
२०२४ मध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत २५० उद्योगांकडून १५ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. मोठ्या उद्योगापेक्षा जिल्ह्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्यामुळे या वर्षी गुंतवणुकीचे कमी सामंजस्य करार झाल्याची माहिती कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ यांनी दिली.
...
उपस्थित अधिकारी
गुंतवणूक परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उदय किसवे, टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांच्यासह उद्योजक, नवउद्यमी, बँकांचे प्रतिनिधी, इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
...
प्रमुख करार ९ कोटींमध्ये)
आक्री ऑर्गेनिक्स : ८४
कॅन्बारा इंडस्ट्रीज : ६५.६२
एमिल फार्मा : ६१.८०
केके टीएटी : ४९
रिजेन्सी टीएमटी : ४८.५०
गुजरात कॉपर : ४८
आर. के. हायड्रोजन : ४८
प्रोफाइल डाटा : ४८
पिरॅमिड टेक्नोलॉजी : ४६
मनसर्फ इंडस्ट्री : ४५.७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.